गुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इसविसनाच्या १४ व्या शतकातील हसन गंगू बहामनी या सुलतानाने त्या काळात स्थापन केलेल्या राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. गुलबर्गा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-हैदराबाद, चेन्नई-बंगलोर या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथील विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.
गुलबर्गा हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर असून या परिसरातील दत्तात्रेय नरसिंह सरस्वतींचे गाणगापूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर या शहरातील कोरांटी हनुमान मंदिर शरण बसवेश्वर मंदिर आदी मंदिरेही प्रेक्षणीय आहेत.
Leave a Reply