गुटी हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. प्राचीन काळी हे शहर सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा एक भाग होते. पुढे ते विजयनगर साम्राज्यात आले. नंतरच्या काळात हैदरअली व टिपू सुलतान यांचीही येथे सत्ता होती. बंगलोर-हैदराबाद महामार्ग क्र. ७ वर हे शहर वसलेले असून, येथे रेल्वेचे मोठे वर्कशॉप आहे.
ऐतिहासिक शहर
गुटी शहरात असलेल्या किल्ल्यातील एका मोठ्या तळ्याचे नाव लक्ष्मण तीर्थम असे आहे. एका आख्यायिकेनुसार वनवासाच्या काळात तहानलेल्या सीतेला पाणी देण्यासाठी लक्ष्मणाने हे तळे निर्माण केले असे सांगतात.
Leave a Reply