
हासन हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून त्याची स्थापना ११व्या शतकात चत्रकृष्णप्पा नाईक यांनी केली.
समुद्रसपाटीपासून या शहराची उंची ९३४ मीटर आहे. येथील हसनम्बा या देवीच्या नावावरुन या शहराचे नामकरण झालेले आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे याच शहरातील रहिवासी होते.
बंगलोर आणि म्हैसूर येथून हासन येथे रेल्वेने जाता येते. या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. चन्नकेशव मंदिर, हौसलेश्वर मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे भेट देतात.
येथील हवामान वर्षभर आल्हाददायक असते. या शहरात अनेक वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.
Leave a Reply