भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. देशातील या क्षेत्राचा वाढीचा दर सध्या १५ टक्के आहे. या वृद्धीत खाजगी क्षेत्राचा वाटा ९० टक्क्याहून अधिक राहील. सरकारी क्षेत्राचा हिस्सा हा सातत्याने कमी राहीला आहे.
भारतात वैद्यकिय पर्यटनातही वाढ होत आहे. भारतात येऊन उपचार घेणार्या विदेशी पर्यटकांची संख्या वर्षाला १ लाखाहून अधिक आहे.
भारतात आरोग्य सेवेसाठी होणार्या खर्चाचे प्रमाण देशाच्या जीडीपीच्या ५ टक्के इतके आहे. यातील ८० टक्के खर्च हा खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवेवर होतो.
जीवनशैलीत होत असलेल्या बदलांमुळे देशात आरोग्यसेवेची गरज खूपच वाढत चालली आहे.
Leave a Reply