
जगातील अनेक इमारती आपल्या खास वैशिष्ठ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण बनलेल्या आहेत. अमेरिकेतही अशा बर्याच इमारती आहेत.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅन लुई अेबिस्पो काऊंटी मधील क्यूस्टा एनकान्डाटा नावाचा महालसुद्धा असेच लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. दाट जंगलात आणि डोंगरमाथ्यावर असलेला हा महाल “हर्स्ट कॅसल” या नावाने ओळखला जातो. ९० हजार चौरस फूटांपेक्षाही अधिक जागेत या महालाचा पसारा आहे.
हा महाल पत्रकार विलियम रंडोल्फ हर्स्ट यांच्यासाठी १९१९ ते १९४७ या काळात बांधला गेला. १९५१ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर तो कॅलिफोर्निया प्रशासनाकडे आला. १९५७ मध्ये या महालाला पर्यटनस्थळ म्हणून जाहीर करण्यात आले. दरवर्षी या महालाला किमान १० लाख पर्यटक भेट देतात.
हर्स्ट यांच्या काळात येथे हॉलीवूड कलाकार, राजकारणी, नेतेमंडळी वगैरेंची मोठी वर्दळ असे.
या महालात ५६ बेडरूम्स, ६१ टॉयलेट, १९ सिटींग रूम्स, १२७ एकरात पसरलेला बगीचा, इनडोअर, आऊटडोअर स्विमिग पूल, टेनिस कोर्ट, मूव्ही थिएटर, रॉयल लायब्ररी, डायनिंग, ज्वेल बॉक्स, एअर फिल्ड आणि सर्वात मोठे खासगी झू आहे.
Leave a Reply