अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे.
जिल्ह्यातील दुसरे, तर विदर्भातील सातवे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असा लौकिक असलेल्या या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालवला जातो. समुद्रसपाटीपासून ३६९ मीटर उंचीवर हे शहर वसलेले असून, सपन आणि बिचन नावाच्या दोन नद्या या शहराबाहेरुन वाहतात. मध्य प्रदेशच्या सीमेवर हे शहर वसलेले आहे.
तिनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले दुल्हागेट आजही शहराचे वैभव आहे. हे गेट इस्माईल खान या सरदाराने बांधले आहे. दुल्हा रहेमान यांच्या दर्ग्याकडे रस्ता जात असल्याने गेटचे नाव असे पडले.
Leave a Reply