छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श जालना शहरास झाल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मराठवाड्याच्या इतिहासाशीच जिल्ह्याचा इतिहास निगडीत आहे. हा मुलुख निजामाकडून मराठ्यांनी जिंकून घेतला व त्यानंतर १८०३ मधील जाफराबाद तालुक्यातील असईच्या युद्धात मराठ्यांना हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यावा लागला. पुढील काळात मराठवाडा मुक्तिसंग्रामात जालनावासियांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जालना जिल्हा स्वातंत्र्यपूर्व काळात हैद्राबादच्या निजामाच्या राज्याचा एक भाग होता. मराठवाडा मुक्तिसंग्रामात जालन्यातील श्री. जनार्दन (मामा) नागपूरकर यांनी आपले प्राण अर्पण केले. शहीद ‘जनार्दन मामा’ यांच्या स्मृती ‘मामा चौक’ येथील त्यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून जतन करण्यात आल्या आहेत.
कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेले जालना हे प्राचीन शहर आहे. १९८२ पर्यंत जालना औरंगाबाद जिल्ह्याचा भाग होता. दिनांक १ मे, १९८२ रोजी वेगळा जालना जिल्हा निर्माण केला गेला. औरंगाबाद व परभणी या जिल्ह्यांची पुनर्रचना केली जाऊनच या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली.
Leave a Reply