नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्ये झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते. अहीर राजांवरूनच येथील लोकांच्या बोलीला अहिराणी भाषा म्हटले जाते. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले नंदूरबार हे शहर पुरातन काळात नंद या गवळी राजाने वसवले असल्याचे मानतात. १९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनात बालक्रांतिकारक शिरीषकुमारने नंदूरबार येथे हौतात्म्य स्वीकारले होते. येथे त्याच्या स्मृती स्मारकाच्या माध्यमातून जतन करण्यात आल्या आहेत.
Leave a Reply