ठाण्यातील नौपाडा भागातली जुनी आईस फॅक्टरी आता काळाच्या पडद्याआड गेली असली तरीही आज नौपाड्यातील हजारो रहिवासी आपला पत्ता लिहिताना `आईस फॅक्टरीजवळ’ असाच लिहितात. अजूनही या भागात जाताना रिक्शावाल्याला आईस फॅक्टरी सांगितले की तो बरोबर आपल्याला तिकडे नेतोच.
एखाद्या शहरातील एखाद्या भागाची ओळख तिथे असलेल्या वास्तू अथवा उद्योगामुळे कायमस्वरुपी होत असते. जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत. यातीलच हे एक उदाहरण ठाण्याचे. हा भाग फार पूर्वी ठाण्याबाहेरचा समजला जायचा. एका काळी इकडे वस्तीला येणे म्हणजे जंगलात जाण्यासारखेच वाटायचे. मग हळूहळू ठाण्याचा विस्तार झाला आणि आईस फॅक्टरीचा भाग शहराचा मुख्य भाग बनला. आता याठिकाणी एक प्रशस्त इमारत आली असून निरनिराळी दुकानेही त्यात आहेत. ही दुकाने केव्हा धंदा बदलतील किंवा नावही बदलतील याची खात्री नाही. मात्र आईस फॅक्टरी हे शब्द लोकांच्या तोंडात नेहमीच रहातील.
Leave a Reply