झाशीची राणी लक्ष्मीबाई (धावदाशी येथे जन्म), पेशवाईतील तत्त्वनिष्ठ न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे(माहुली) या दोघांचा जन्म सातारा जिल्ह्यातच झाला होता. त्याचप्रमाणे थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, विष्णुशास्त्री पंडित, ‘सुधारक’कार आगरकर व भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रिबाई फुले,नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म साता-यातील रहिमतपूर इथला.
ज्येष्ठ लोककलावंत (कै).शाहीर साबळे व महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजक श्री.(कै)बी.जी. शिर्के यांचा जन्म जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावचा. आपापल्या क्षेत्रात उच्च शिखर गाठल्यानंतरही या दोघांनीही आपल्या गावाशी संपर्क ठेवलेला होता.तर गो.पु.देशपांडे, बाळ कोल्हटकर, ज्येष्ठ कादंबरीकार रवींद्र भट (वाई) हे कलावंतदेखील मूळचे इथलेच.
ज्येष्ठ लेखिका गौरी देशपांडे यांचे वास्तव्य अनेक वर्षे फलटणजवळील विंचूर्णी या गावी होते. या गावाचे संदर्भ त्यांच्या लेखनात डोकावलेले दिसतात.
आपल्या ओघवत्या वाणीने व वैशिष्ट्यपूर्ण वक्तृत्वशैलीच्या माध्यमातून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, श्रीरामकृष्ण परमहंस या व्यक्तिमत्त्वांचे एक निराळेच दर्शन घडवणा-या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले गेली अनेक वर्षे फलटण येथे वास्तव्यास आहेत. ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून देणारे श्री.खाशाबा जाधव हे कर्हाड तालुक्यातील गोळेश्र्वर या गावचे होते. श्री.जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्ती या खेळात कास्य पदक मिळविले होते. यांचे शालेय शिक्षण कर्हाडमध्ये झाले होते.
Leave a Reply