
आयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ ८१,६८ वर्ग किमी असून ते युरोपातील ३ रे तर जगातील २० वे सर्वांत मोठे बेट आहे. आयर्लंड बेटाचा पाच षष्ठांश (५/६) भाग आयर्लंड ह्या देशाने व्यापला आहे तर उर्वरित भूभाग युनायटेड किंग्डमच्या उत्तर आयर्लंड ह्या घटक देशाच्या अखत्यारीखाली आहे.
आयर्लंड संसदीय प्रजासत्ताक आहे. राष्ट्राध्यक्षांना (भारतीय राष्ट्रपतींप्रमाणे) नावापुरती सत्ता असते. राष्ट्राध्यक्षाची थेट निवड सात वर्षांसाठी असते व एका व्यक्तीला फक्त दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होता येते. राष्ट्राध्यक्ष संसदेच्या सल्ल्यानुसार टाओइसीचची (पंतप्रधान) नेमणूक करतात. सहसा अशा व्यक्ती राष्ट्रीय निवडणूकांत बहुमत मिळालेल्या पक्षाचे नेता असतात (भारताप्रमाणेच). गेल्या काही दशकांत आयर्लंडमध्ये अनेक पक्षांचे मिश्र सरकार सत्तेत आहे.
Leave a Reply