मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर – जालना

Jalna - A major town in Marathwada

महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात समाविष्ट असलेले जालना हे शहर कृषी आधारित उद्योगासाठी प्रसिध्द आहे. समर्थ रामदास स्वामी याचे वास्तव्य होते. १९८२ पूर्वी हे शहर औरंगाबाद जिल्ह्याच्या भागात होते.

१ मे १९८२ रोजी जालना जिल्हा अस्तित्वात आला. त्यानंतर हे शहर प्रशासकीय मुख्यालय बनले.

जालना शहर हे राज्य आणि देशातील इतर शहरांशी ब्रॉडगेज रेल्वे लाईनने तसेच राज्य महामार्गाने जोडलेले आहे.

जालना जिल्हा हा हायब्रीडसीडस् साठी प्रसिध्द असून स्टील रिरोलींग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारीत उद्योगधंदे उदा. दाल मील, बि.बीयाने इ. तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिध्‍द आहे.

जालना जिल्हयातील जनतेने मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*