कक्कनाड हे शहर सध्या केरळमधील कोची शहरांतर्गत येते. एर्नाकुलम जिल्ह्याचे हे मुख्यालय असून, राज्यशासनाची अनेक कार्यालये येथे आहेत. तसेच आयटी उद्योगाशी संबंधितही अनेक संस्था या ठिकाणी आहेत. कक्कनाड हे शहर थ्रिक्ककारा या ऐतिहासिक शहरापासून जवळ आहे. येथे मोठी औद्योगिक वसाहत असून, मोठ्या प्रमाणात लोकांना येथे रोजगार उपलब्ध झालेले आहेत.
शहरात केंद्राची अनेक कार्यालये
केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाची ‘शिक्षा भवन’ ही संस्था कक्कनाड शहरात आहे. ‘प्रसारभारती’चे प्रादेशिक प्रसारणाचे एक केंद्रही येथेच आहे. येथे राज्य सरकारचे आयटी पार्क असल्याने गृहबांधणी – उद्योगही मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे.
Leave a Reply