महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात कळंब हे चिंतामणी गणपतीसाठी प्रसिध्द आहे. हिंदू धर्म ग्रंथानुसार येथील वृक्षाखाली इंद्रदेवाने श्री गणेशाची स्थापना केली.
कळंब हे यवतमाळ – नागपूर रस्त्यावर वसलेले एक प्राचीन गाव आहे. येथे चिंतामणी गणेशाचे भूमिगत मंदिर आहे. ‘गणेश कुंड’ म्हणून प्रसिद्ध पाण्याची टाकी आहे. गाव चक्रवर्ती नदीच्या तीरावर वसलेले आहे. श्री चिंतामणीची जत्रा माघ शुद्ध चतुर्थी पासून सप्तमीपर्यंत भरते.
येथे दर बारा वर्षांनी मंदिराचा परिसर जलमय होतो. परंतु, श्री गणेशाच्या स्पर्शाने पाणी ओसरते, अशी श्रध्दा आहे.
येथे पावन नावाचे पाण्याचे कुंडही आहे.