आसाम राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले करीमगंज हे शहर बांगलादेशच्या सरहद्दीवर वसलेले आहे. कुशीयारा नावाची नदी या शहराजवळून वाहते. ही नदीच भारत आणि बांगलादेश यांच्यामधली सीमा मानली जाते. या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नोटी खल नावाचा एक मोठा कालवा या शहरातून वाहतो.
करीमगंज जिल्ह्याची स्थापना १९८३ मध्ये झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात आले. त्यापूर्वी हे शहर सील्हेट जिल्ह्याचा एक भाग होते. रस्ते व रेल्वे मार्गाने हे शहर देशाच्या विविध भागांशी जोडलेले आहे. गुवाहाटीपासून करीमगंज ३५० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
Leave a Reply