करुर हे तामिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. अमरावती नदीच्या किनार्यावर वसलेल्या या प्राचीन शहरावर चेरा, विजयनगर, मदुराई नायक, हैदर अली, आदी राजांची राजवट होती. चेन्नईपासून ३७० किलोमीटरवर हे शहर आहे. १८७४ साली स्थापन झालेल्या माहानगरपालिकेमार्फत या शहराचा कारभार चालतो. रस्ते व रेल्वे मार्गाने या शहरात जाता येते.
टेक्सटाईल सिटी नावाने प्रसिध्द
करुर शहरात अनेक हातमाग व यंत्रमाग असून, येथे तयार होणारे कापड संपूर्ण तामिळनाडू राज्यात प्रसिध्द आहे. म्हणूनच या शहराला टेक्सटाईल सिटी म्हणूनही ओळखतात. अनेक पेपर मिल व बसची बॉडी बांधणारे उद्योगही या शहरात आहेत.
Leave a Reply