कायर हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील वणीपासून २० किमीवर विदर्भ नदीच्या तीरावर वसले आहे.
केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नागपूर सर्कलतर्फे येथे सध्या सुरू असलेल्या उत्खननात सातवाहनकालीन संस्कृतीच्या खुणा सापडल्या असून, या बहुसांस्कृतिक ठिकाणी त्याही पूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा सापडू शकतात असा पुरातत्व उत्खनन विभागाचा अंदाज आहे.
नागपूर जिल्ह्यातील अडम नंतर विदर्भातील हे दुसरे मोठे उत्खनन आहे. कायर येथे प्राचीन वारसा सापडण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी प्रारंभी केलेल्या उत्खननातच येथे बहुकालिक संस्कृतीच्या खुणा सापडतील हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने २४ जानेवारी २०१५ पासून उत्खनन सुरू केले.
याठिकाणी सातवाहनकालीन संकुलाचे अवशेष, टेराकोटाच्या मातीच्या फरशा चमचे, सोन्याची बांगडी, चांदी, सोने जस्ताचे शिक्के, सातवाहनकालीन मुद्रांचे ठप्पे मारलेले सिलिंग, मणी आदी वस्तू मिळाल्या.
यामुळे विदर्भातील ताम्रपाषाणकालीन संस्कृतीवर बराच प्रकाश पडेल अशी आशा आहे.
Leave a Reply