कोल्हापूर शहराच्या पूर्वेला जयंती ओढ्याच्या पश्चिम किनाऱ्यावर सिद्धिविनायक मंदिर आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या छत्रपतींचे संस्थानच्या सेवेत असलेले ज्योतिषी बाळ जोशीराव यांनी बांधल्याची व तेथे गणपतीची प्रतिष्ठापना केल्याची इतिहासात नोंद आहे. त्या काळात जोशीराव यांनी कोल्हापुरात सुमारे २९ गणेश मंदिरांची स्थापना केली, त्यापैकीच एक म्हणजे ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिर.
साक्षीविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. करवीर यात्रा करणारा प्रत्येकजण या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातो आणि यात्रेचा समारोपही येथील दर्शनाने करतो, अशी या मंदिरासंदर्भातील इतिहासात विशेष नोंद आहे.
छोट्या गाभाऱ्यात असलेली बैठी मूर्ती शेंदरी रंगाने रंगवलेली आहे. मूर्ती चतुर्भुज असून, उजव्या हातात परशू व दत्त तर डाव्या हातात अंकुश आणि मोदक आहे. मस्तकावर पाच फण्यांच्या शेषनागाची छाया आहे. पंचतत्त्वाचे प्रतीक म्हणूक पाच फण्यांच्या नागाची फण ओळखली जाते. ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या एका बाजूला बालगणेशाची मूर्ती आहे, जी वरदविनायकाचे प्रतीक मानले जाते. बाळ जोशीराव यांनी छत्रपतींना वेळोवेळी जे भविष्य सांगितले आहे, ते याच गणपतीला साक्षी ठेवून. त्यातूनच या गणपतीला साक्षीविनायक असे संबोधले जाते.
अधिक माहितीसाठी भेट द्या :
https://puputupu.blogspot.com/2013/09/sakshivinayak-devsthan-mandir-kolhapur.html
Leave a Reply