कोलम हे केरळमधील एक महत्त्वाचे शहर असून, येथे देशातील जुने मोठे बंदर आहे. पूर्वी या शहराला ‘देशिंगनाडू’ असे नाव होते. येथून विदेशांतील विविध शहरांशी व्यापार चालत असे. हे शहर अष्टमुडी तलावाच्या काठावर वसलेले आहे. कोलम हे केरळमधील लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे मोठे शहर असून, येथे काजूबियांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आहेत.
पर्यटकप्रिय शहर
कोलम शहरातील रेल्वे जंक्शन हे केरळमधील दुसरे मोठे रेल्वे जंक्शन असून, येथील रेल्वे प्लॅटफॉर्म १ किलोमीटर लांबीचा आहे. पर्यटकांच्या या आवडत्या शहरात सध्या अनेक थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेल्स आहेत.
Leave a Reply