कोन्नी हे केरळ राज्यातील पत्तनम्तिट्टा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुवट्टपुझा ते पुनलूर या मार्गावर पत्तनम्तिट्टापासून ११ किलोमीटरवर ते वसलेले आहे. हे शहर या परिसरातील हत्ती तसेच रबर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील हिरवीगर्द झाडी व गवताळ डोंगर हे हत्तींसाठी जणू स्वर्गच आहेत. या परिसरातील निसर्गसौंदर्य अवर्णनीय असेच आहे.
हत्ती प्रशिक्षण केंद्र प्रसिद्ध
कोन्नी शहरातील हत्तींचे प्रशिक्षण केंद्र प्रसिद्ध आहे. येथील हत्तींसाठी बांधण्यात आलेले लाकडी ओंडक्यांचे उंच निवारे प्रेक्षणीय असून, या निवाऱ्यांना ‘अनक्कुडू’ असे म्हणतात. एका निवाऱ्यात एका वेळी तीन ते चार हत्तींची सोय केलेली असते.
Leave a Reply