कोसोव्हो हा बाल्कन भौगोलिक प्रदेशामधील एक अंशत: मान्य भूपरिवेष्ठित देश आहे.
युगोस्लाव्हियाचे विघटन होण्याआधीपासूनच कोसोव्होमध्ये जातीय तणावाचे वातावरण होते. १९८९ साली स्लोबोदान मिलोसेविचने कोसोव्हो भागातील स्थानिक आल्बेनियन मुस्लिम जनतेची पिळवणुक करण्यास सुरूवात केली होती. १९९५ साली बॉस्नियन युद्ध संपल्यानंतरही कोसोव्होमधील मुस्लिम जनतेवरील अत्याचार सुरूच राहिले. सर्बियाने येथील फुटीरवादी चळवळ मोडून काढण्यासाठी सर्रास कोसोव्होमधील साधारण नागरिकांची कत्तल सुरू केली. अखेर आंतरराष्ट्रीय समुदायाला दखल घेणे भाग पडले व २४ मार्च ते १० जून १९९९ दरम्यान नाटोने युगोस्लाव्हियावर केलेल्या बाँबहल्ल्यानंतर सर्बियाने माघार घेतली. १० जून १९९९ रोजी संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने ठराव मंजूर करून हा भूभाग आपल्या अखत्यारीखाली घेतला. पुढील ९ वर्षे संयुक्त राष्ट्रांच्या तात्पुरत्या राजवटीनंतर १७ फेब्रुवारी २००८ रोजी कोसोव्होने स्वातंत्र्याची घोषणा केली. कोसोव्होला २०१२ सालाअखेरीस संयुक्त राष्ट्रसंघाच्या एकूण ९८ सदस्य देशांनी मान्यता दिली आहे. सर्बियाने अद्याप स्वतंत्र कोसोव्होला मान्यता दिलेली नाही. कोसोव्हो आपल्या देशाचाच एक प्रांत असल्याचा दावा सर्बियाने केला आहे. भारत देशाने ह्या बाबतीत सर्बियाला पाठिंबा दर्शवला आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : प्रिस्टिना
अधिकृत भाषा : सर्बियन, आल्बेनियन
स्वातंत्र्य दिवस :१७ फेब्रुवारी २००८ (सर्बियापासून)
राष्ट्रीय चलन : युरो
Leave a Reply