कोझीकोडे हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये कोझीकोडेचा तिसरा क्रमांक लागतो. तिरुअनंतपूरमपासून ३८० किलोमीटरवर ते वसलेले आहे. या शहराला पूर्वी कालिकत असेही नाव होते. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांची काही काळ सत्ता होती. येथील कलिको क्लोथ नावाचे कापड प्रसिद्ध होते.
शिल्पनगरम नावाने प्रसिद्ध
कालिकत शहराच्या विविध भागांत शिल्पकलेचे अनेक सुंदर नमुने पहायला मिळतात. त्यामुळेच या शहराला सिटी ऑफ स्क्लप्चर किंवा शिल्पनगरम असेही म्हणतात. देशातील निवडक सुंदर शहरांच्या यादीत या शहराची गणना होते.
Leave a Reply