कुंभकोणम हे तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तंजावरपासून ते अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे. या शहराच्या उत्तरेस कावेरी नदी वाहते, तर दक्षिणेस अर्सलर नावाची नदी वाहते. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या १,४०,१५६ इतकी आहे. हे शहर एकेकाळी चोल साम्राज्याची राजधानी होती.
मंदिरांचे शहर
कुंभकोणम शहरात अनेक देवी, देवतांची मंदिरे असल्याने या शहराला ‘मंदिरांचे शहर’ असेही म्हणतात. या शहरात साजऱ्या होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण ‘महामहम’ महोत्सवाच्या काळात देशविदेशांतील हजारो लोक या शहराला भेट देतात.
Leave a Reply