लिबिया हा उत्तर आफ्रिका खंडातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील एक देश आहे. लिबियाच्या पूर्वेला इजिप्त, पश्चिमेला ट्युनिसिया व अल्जीरिया, दक्षिणेला चाड व नायजर तर आग्नेय दिशेला सुदान हे देश आहेत. लिबियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. त्रिपोली ही लिबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
सुमारे १८ लाख क्षेत्रफळ असलेला लिबिया हा आफ्रिकेतील चौथा मोठा तर जगातील १७व्या क्रमांकाचा देश आहे व येथील लोकसंख्या अंदाजे ६४.२ लाख आहे. ह्यापैकी बहुसंख्य लोक देशाच्या उत्तर भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्याजवळ वसले आहेत तर सहारा वाळवंट असलेल्या दक्षिण भागात अत्यंत तुरळक वस्ती आहे. लिबियातील बहुतांशी जनता अरब वंशाची आहे
मोठ्या प्रमाणावर असलेल्या खनिज तेलाच्या साठ्यांमुळे हा देश आर्थिक दृष्ट्या बळकट आहे. लिबियाची अर्थव्यवस्था आफ्रिका खंडामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे तर मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत लिबिया आफ्रिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.
सोळाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत लिबियावर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती तर १९११ ते १९५१ दरम्यान लिबिया ही इटली देशाची एक वसाहत होती. १९६९ सालापासून मुअम्मर अल-गद्दाफी हा लिबियाचा राष्ट्रप्रमुख व सर्वेसर्वा आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : त्रिपोली
अधिकृत भाषा : अरबी
राष्ट्रीय चलन :लिबियाई दिनार
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply