मडिकेरी हे कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून कोडगू जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून येथे देश-परदेशातील पर्यटकांची नेहमी ये-जा असते. या शहराचे नाव येथील राजे मुडुराज यांच्या नावावरून पडलेले आहे. कन्नड शब्द मुडुराज केरी म्हणजे मुडुराजाचे शहर. इ.स.१६३३ ते १६८७ दरम्यान या राजाची येथे राजवट होती.
आल्हाददायक हवामान
मडिकेरी शहर ८८ क्रमांकाच्या म्हैसूर मंगलोर राज्य महामार्गावर असून म्हैसूरपासून १२० किमीवर आहे. येथील किल्ला, ओंकारेश्वर मंदिर, राज सीट ही स्थळे प्रेक्षणीय आहेत. उन्हाळ्यात येथील हवामान आल्हाददायक असते.
Leave a Reply