मदुराई हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. वैगाई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तमिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. देशातल्या प्राचीन शहरांच्या यादीत या शहराचा समावेश होतो. अनेक प्राचीन मंदिरे या शहरात असून, येथील मिनाक्षी मंदिर जगप्रसिद्ध आहे. २५०० वर्षांपूर्वीच्या या शहराला ‘पूर्वेकडील अथेन्स’ असेही म्हणतात.
तमिळ शिक्षणाचे केंद्र
मदुराई येथे एकेकाळी तमिळ भाषेच्या शिक्षणाचे मुख्य केंद्र होते. आजही तेथे अत्यंत शुद्ध तमिळ भाषा बोलली जाते. या शहरात कापड बनवणे, रंगवणे, याचबरोबर मलमलचे कापड बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात केला जातो.
Leave a Reply