मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी समुद्राने विभागलेले द्वीपकल्पीय मलेशिया आणि मलेशियन बोर्निओ हे प्रमुख दोन भाग आहेत. थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स या देशांना लागून मलेशियाच्या सीमा आहेत. हा देश विषुववृत्ताजवळ वसलेला असल्यामुळे येथील हवामान विषुववृत्तीय हवामानप्रकारानुसार आहे. मलेशियामध्ये वेस्टमिन्स्टर धर्तीवरील संसदीय लोकशाही असून सत्तेच्या सर्वोच्चपदी यांग दी-पेर्तुआन आगोंग (राजा) व कार्यकारी प्रमुखपदी पंतप्रधान असतात.
जमिनीच्या क्षेत्रफळानुसार ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रपफळाचा मलेशिया जगात ६६ व्या क्रमांकाचा मोठा देश असून २.८ कोटी लोकसंख्येसह जगाला ४३ व्या क्रमांकावर आहे. याच्या पश्चिमेस थायलंड, पूर्वेस इंडोनेशिया व ब्रुनेई हे देश असून दक्षिणेस जोहोर सामुद्रधुनीवरील पुलाने जोडला गेलेला सिंगापूर आहे. व्हिएतनाम व फिलिपिन्स या देशांशी मलेशियाच्या सागरी हद्दी भिडल्या आहेत.
मलेशियात १३ राज्ये व ३ संघशासित प्रदेश आहेत.
राजधानी : पुत्रजय, क्वालालंपूर
सर्वात मोठे शहर : क्वालालंपूर
अधिकृत भाषा : मलाय
स्वातंत्र्य दिवस : ऑगस्ट ३१, इ.स. १९५७ (युनायटेड किंग्डमपासून), सप्टेंबर १६, इ.स. १९६३(सबा, सारावाक, सिंगापूर यांसमवेतच्या संघराज्यापासून)
राष्ट्रीय चलन : मलेशियन रिंगिट (MYR)
( Source : Wikipedia )
Leave a Reply