मालदीव

मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस ७५० किलोमीटरवर आणि भारताच्या नैर्ऋत्येस ६०० किलोमीटरवर आहेत. माले ही मालदीवची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत मालदीव आशियातील सर्वात छोटा आहे.

१९६५ साली ब्रिटिश साम्राज्यापासून मालदीवला स्वातंत्र्य मिळाले. सध्या मालदीवची अर्थव्यवस्था बऱ्याचशा प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे. इस्लाम हा येथील प्रमुख धर्म आहे. मालदीव इस्लामिक सहकारी संघटना, सार्क, राष्ट्रकुल परिषद, अलिप्त राष्ट्रगट चळवळ, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : माले
अधिकृत भाषा : दिवेही
स्वातंत्र्य दिवस : २६ जुलै १९६५ (युनायटेड किंग्डमपासून)
राष्ट्रीय चलन : मालदीवी रुफिया

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*