
मुंबईपासून सर्वात जवळ असलेले आणि सहजपणे जाता येणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेले हे छोटेखानी गाव इंग्रजांच्या काळातील बंगल्यांनी नटलेले आहे.
मुंबई-पुणे लोहमार्गावर कर्जतच्या अलिकडे असलेल्या नेरळ या स्थानकावरुन माथेरानला जाण्यासाठी मिनी ट्रेनची व्यवस्था आहे. माथेरानमध्ये इंधनावर चालणार्या गाड्यांना पूर्णपणे मज्जाव आहे. त्यामुळे संपूर्ण गावात फक्त पायवाट किंवा घोड्यावर बसून जावे लागते.
१८५४ मध्ये सर मॅलेटने माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला.
गर्द हिरवीगार वनराई आणि मोठा तलाव तसेच व्हा पॉंईटस, कॅथड्रेल पार्क, ऑलिम्पिया रेसकोर्स, राबाग खेडे लॉर्ड उद्यान, पेमास्टार पार्क आदी स्थळे पाहण्यासारखे आहेत.
Leave a Reply