मेक्सिको किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने (स्पॅनिशमध्ये एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस) हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. मेक्सिको जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला देश आहे. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते.
प्राचीन नगरी ‘देवदिवाकान ‘ हिचे दोन हजार वर्षांपूर्वीच्या या महानगरीतील अवशेष आजही पहायला मिळतात.येथील चंद्रमंदिरात ललोक आणि केल्सल कोल्ला या देवतांची मंदिरे आहेत. केल्सल हा पवित्र पक्षी आणि कोल म्हणजे सर्प.पृथ्वी आणि आकाश यांच्या एकत्वाचे प्रतीक असलेली ही देवता. पुरोहितांचे प्रासाद तसेच नगरवासीयांची घरे याच परिसरात होती.उत्सवप्रसंगी लोक येथे एकत्र जमत असत.
मेक्सिको उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागात असून त्याचा आकार साधारणत: त्रिकोणी आहे. वायव्येपासून ईशान्य टोकापर्यंतची लांबी अंदाजे ३,००० कि.मी. व रुंदी उत्तरसीमेवर २,००० कि.मी. तर तेहुआन्तेपेकच्या सामुद्रधुनीजवळ २२० कि.मी. इतकी आहे. मेक्सिकोचा मध्य भाग एक उंच पठार आहे. पठाराच्या पूर्व-पश्चिमेस पर्वतरांगा असून त्यापलिकडे तटीय प्रदेश आहेत. मेक्सिकोचे दोन द्वीपकल्प, पश्चिमेस बाहा कॅलिफोर्निया व पूर्वेस युकातन यांची भौगोलिक रचना वेगळीच आहे. १,२५० कि.मी. लांबीचा बाहा कॅलिफोर्निया पॅसिफिक महासागर व कॅलिफोर्नियाच्या अखाताच्या मधली चिंचोळी पट्टी आहे तर युकातन मेक्सिकोचा अखात व काम्पीचीच्या अखातामधील भूभाग आहे.
मेक्सिकोच्या भौगोलिक रचना व हवामान यात वैविध्य आहे. सोनोराच्या दगड-धोंड्यांचा वाळवंटापासून सिनालोआच्या घनदाट जंगलापर्यंत सगळ्याप्रकारचे हवामान येथे आढळते.
उत्तर सीमेवरील रियो ब्राव्हो देल नोर्ते (रियो ग्रान्दे), दक्षिण सीमेवरील उसुमासिन्ता व ग्रिहाल्वा, बाल्सास, पानुको, याक्वी वगैरे मक्सिकोतील प्रमुख नद्या आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :मेक्सिको सिटी
अधिकृत भाषा :स्पॅनिश
राष्ट्रीय चलन :मेक्सिकन पेसो(MXN)
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply