मिरी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक महत्वाचे शहर आहे. पैठण रोडवर वसलेले हे शहर नेवासापासून २० किलोमीटर अंतरावर आहे.
येथे शंभर वर्षांपेक्षा जुने चर्च आहे. येथे दरवर्षी २८ ऑगस्टला जत्रा भरते.
येथे चैतन्य कानिफनाथ (कान्होबा) आणि वीरभद्र यांची मंदिरेही आहेत. कानिफनाथाचे मंदिर औरंगजेबाने १६४४ मध्ये बांधले. येथे रंगपंचमीच्या दिवशी जत्रा भरते.
मिरी या शहरापासून अगदी जवळच माका नावाचे प्रसिद्ध गाव असून, त्यामुळेच आता या शहराला ‘मिरी माका’ असे नाव पडलेले आहे. या शहरातील बोर्डिंग स्कूल जवळपास १५० वर्षे जुने आहे.
Leave a Reply