मुंबई – पुणे मार्गावर चिंचवड हे गांव आहे. पुणे शहरापासून ११ मैलावर हे गांव आहे. येथे जाण्यासाठी बसची सोय आहे. श्री मोरया गोसावी यांनी या गावात मंगल मूर्तीची स्थापना केली. (हे फार थोर गणेशभक्त होते. यांचे चरित्र गणेश भक्तांनी अवश्य वाचावे.) मोरया गोसावींनी इस. १६५५ मध्ये येथेच जिवंत समाधी घेतली. त्या समाधीवर १६५९ मध्ये चिंतामणी गोसावींनी मंदिर उभारले. मोरया गोसावी नंतरच्या सात पिढ्यांमधील प्रत्येक सतपुरूषाच्या दहन भूमीतून एकेक गणेश मूर्ती वर आली. या सातही समाध्या आपणास पहावयास मिळतात. हे मंदिर पवना नदीच्या काठावर उत्कृष्ठ व मजबुत बांधलेले आहे.
या समाधीचे दर्शन झाल्यावर गावातील मंगलमूर्ती वाडा लागतो. या वाड्यात संस्थानच्या गादीवरील देव कुटुंब राहते. याच वाड्यात मोरया गोसावींना मोरगाव येथे मिळालेली प्रसादित मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागे ‘कोठारेश्वर नावाची आणखी एक मुर्ती आहे. तिची रचना अशी आहे की सभा मंडपातील मुख्य मंगलमूर्ती पाहताना ही कोठारेश्वर मूर्ती दिसू शकते. या ठिकाणाला तुकाराम महाराज, समर्थ रामदास यांनी भेटी दिल्या आहेत. येथे धर्मशाळा आहे व राहण्याची सोय होऊ शकते.
Leave a Reply