म्यानमार हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश – म्हणजे १,९३० कि.मी. – लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन ही येथील प्रमुख खनिजे आहेत.
ऐतिहासिक काळापासून म्यानमारमधील वांशिक विविधता राजकारणावर व समाजगतिकीवर प्रभाव टाकत आली आहे. आधुनिक काळातदेखील या देशाच्या राजकीय पटलावर वांशिक तणावांची पडछाया पडल्याचे दिसून येते. इ.स. १९९२ सालापासून म्यानमारची शासनव्यवस्था जनरल थान श्वे यांच्या नेतृत्त्वाखालील लष्करप्रणीत आघाडी सरकाराच्या नियंत्रणात आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :नेपिडो
अधिकृत भाषा :बर्मी, जिंगफो, शान, कारेन, मोन, तमिळ
राष्ट्रीय चलन :म्यानमारी क्यात
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply