म्हैसूर हे कर्नाटकातील तिसरे मोठे शहर असून या शहराला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. १३९९ पासून १९४७ पर्यत हे म्हैसूर राज्याच्या राजधानीचे शहर होते.
बंगळुरुपासून १४६ किलोमीटरवर असलेल्या चामुंडी पर्वताच्या पायथ्याला हे सुंदर शहर वसलेले असून इथले चामुंडेश्वरी मंदिर प्रसिध्द आहे. येथे सर्वाधिक काळ वडियार घराण्याची सत्ता राहिली आहे.
म्हैसूर येथील सुंदर राजवाडा व येथे साजरा होणारा राजेशाही दसरा महोत्सव पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. म्हैसूर पाक व म्हैसूर पेठा या नावाची इथली मिठाई प्रसिद्ध असून इथल्या भरजरी साड्याही प्रसिद्ध आहेत. जगप्रसिद्ध वृंदावन गार्डन येथेच आहे.
Leave a Reply