उटी हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते देशातील एक सुंदर हिलस्टेशन आहे. निलगिरि पर्वतरांगांच्या कुशीत ते वसलेले आहे. कोईम्बतूरपासून ते ८० किलोमीटरवर आहे. रस्ता व रेल्वे मार्गाने हे शहर देशातल्या अनेक भागांशि जोडले असून,हजारो पर्यटक येथे उन्हाळ्यात भेट देतात.
पर्यटन हाच मुख्य व्यवसाय
उटीतील लोकांचा सध्या पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असून, पर्यटकांच्या सोईसाटि येथे शेकडो हॉटेल्स, रिसॉर्ट बांधलेले आहेत. येथील बॉटनिकल गार्डन, रोज गार्डन, माउंटन रेल्वे, वॅक्स म्युझियम,मुडुमलई नॅशनल पार्क ही स्थळे प्रेक्षणीय आहेत.
Leave a Reply