उस्मानाबादेचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचे कायम वसतिस्थान असलेले तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. संत गोरोबा काकांचे जन्म गाव ‘तेर’ याच जिल्ह्यातले. नळदूर्ग किल्ला, भूम तालुक्यातील जैन पंथाचे पवित्र स्थान, बौद्ध धर्मीयांची ‘धाराशीव लेणी’, मुस्लीम बांधवांचा ‘ख्वाजा शम्सूद्दिन गाझींचा दर्गा इत्यादी धार्मिक स्थाने ही उस्मानाबाद जिल्ह्याची प्रमुख धार्मिक वैशिष्ट्ये होत. उस्मानाबाद जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे रब्बी हंगामात घेतली जाणारी ज्वारी (शाळू) विशेष प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील पानमळे प्रसिद्ध आहेत.
Related Articles
यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
June 26, 2015
अकोला जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय
June 24, 2015
जळगाव जिल्हा
June 23, 2015