पॅलेस्टाईन हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्र व जॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. पॅलेस्टाईन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. सध्या पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये इस्रायल हा स्वतंत्र देश तर गाझा पट्टी व वेस्ट बँक हे दोन पॅलेस्टिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळून सार्वभौम पॅलेस्टाईन राज्य स्थापण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. पॅलेस्टाईन राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वादग्रस्त पॅलेस्टिनी राज्यावर सध्या पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीची सत्ता आहे.
Leave a Reply