पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते.
हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायर्या चढून येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.
हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, इ.स. १७४९ रोजी हे मंदिर उभे राहिले.
याच पर्वतीच्या टेकडीवर काही लेणीसुद्धा आहेत.
Leave a Reply