पेरूचे प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनार्यावरील एक देश आहे. पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिली हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत.
प्रागैतिहासिक काळापासून ह्या प्रदेशावर स्थानिक आदिवासी वसाहती व इन्का साम्राज्याचे अधिपत्य होते. १६व्या शतकात क्रिस्तोफर कोलंबसने लॅटिन अमेरिकेचा शोध लावल्यानंतर स्पेनने इतर दक्षिण अमेरिकन प्रदेशांप्रमाणे येथे आपली वसाहत स्थापन केली. १८२१ साली पेरूला स्वातंत्र्य मिळाले.
सध्या पेरू हा एक लोकशाहीवादी विकसनशील देश असून येथील लोकसंख्या सुमारे २.९५ कोटी इतकी आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी उद्योगांवर अवलंबून आहे.
१२,८५,२१६ चौरस किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या पेरू देशाच्या भौगोलिक रचनेमध्ये प्रशांत महासागराच्या किनार्यावरील रूक्ष व सपाट प्रदेश, आन्देस तसेच अॅमेझॉन नदीच्या खोर्यातील घनदाट जंगलांचा समावेश होतो. अॅमेझॉनचा उगम पेरू च्या दक्षिण भागातील नेव्हादो मिस्मी ह्या अँडीझमधील एका शिखरावर होतो. उकायाली व मारान्योन ह्या अॅमेझॉनच्या पेरूमधील प्रमुख उपनद्या आहेत. टिटिकाका हे दक्षिण अमेरिकेमधील सर्वात मोठे सरोवर देशाच्या आग्नेय भागात बोलिव्हियाच्या सीमेवर स्थित आहे. विषुववृत्ताच्या जवळ असून देखील पेरूमधील हवामान तीव्र नाही.
पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिली हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत.
पेरू देश एकूण २५ प्रदेश व लिमा ह्या प्रांतामध्ये विभागला गेला आहे.
सुमारे २.९५ कोटी (दक्षिण अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर) लोकसंख्या असलेल्या पेरू देशामधील ७५% जनता शहरांमध्ये राहते. लिमा, अरेकिपा, त्रुहियो, चिक्लायो ही येथील प्रमुख शहरे आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :लिमा
अधिकृत भाषा :स्पॅनिश, किशुआ, आयमारा
राष्ट्रीय चलन :नुएव्हो सोल (PEN)
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply