
पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर. पूर्वी पुणे शहर हे पेठांचे शहर म्हणून प्रसिध्द होते. या सर्व पेठा नदीच्या आसपासच्या भागात होत्या. या पेठांची नावे बहुतकरुन आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसविल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावावरुन ठेवली आहेत. उदाहरणार्थ सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ वगैरे वारांवरुन आणि नाना पेठ, रास्ता पेठ वगैरे व्यक्तींच्या नावावरुन. आता पुणे शहर मध्यवस्तीतील नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन त्याला नवीन उपनगरे जोडली जात आहेत. असाच प्रकारच्या पेठा महाराष्ट्रातील इतर काही शहरांमध्येही आहेत.