राक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर शनिदेवांच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शनिदेवांच्या मूर्तीची स्थापना रामायणकाळात प्रभू रामचंद्रांच्या हस्ते झाल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी प्राचीन काळी दंडकारण्य होते असा उल्लेख पुराणातही आढळतो.
१० ऑगस्ट १७६३ रोजी थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा निर्णायक युध्दात सडकून पराभव केला होता. तसेच निजामाचा सेनापती विठ्ठल सुंदर हासुद्धा या युध्दात मुत्युमुखी पडला होता. ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे.
Leave a Reply