रेडी हे गांव सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असून तेथील गणपती हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव सुप्रसिद्ध गणपती आहे.
रेडी येथील यशवंत गड किल्ल्यावर हे गणेशस्थान असून हा गणपती प्राचीन आहे.
वेंगुर्ले व सावंतवाडी येथून रेडीस जाण्यास एस्. टी. बसेस आहेत. मुंबई वेंगुर्ले ५१३ किमी. आहे.
जमिनीच्या पोटातून खणून ही गणेशमूर्ती बाहेर काढण्यात आली. ही गणेश मूर्ती दगडात कोरलेली असून भव्य व सुंदर आहे.
हा स्वयंभू गणपती भावीक व पर्यटकांचे आकर्षण झाला आहे.
Leave a Reply