
रोईंग हे अरुणाचल प्रदेशतील लोअर दिबंगव्हॅली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या १०१०६ असून पुरुषांचे प्रमाण ५७ टक्के तर महिलांचे प्रमाण ४३ टक्के आहे. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण ७३ टक्के असून, राष्ट्रीय साक्षरता प्रमाणापेक्षा (५९.५ टक्के) ते जास्त आहे.
रोईंग हे शहर पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. येथील मेहो वाईल्ड लाईफ सेंच्युरी, मेहो लेक, सॅली लेक प्रसिध्द आहेत. मिश्मी पर्वतरांगाच्या पायथ्याशी हे शहर वसलेले आहे. मिश्मी आणि आदी या जमातींच्या लोकांचे या शहरात वास्तव्य असून, त्यांचे सोलंग आणि रेह हे उत्सव प्रसिध्द आहेत.
Leave a Reply