शिवगंगा हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहराला मरथू पंडियार यांची भूमी असेही म्हटले जाते. हे शहर समुद्रसपाटीपासून १०२ मीटर उंचीवर वसलेले असून, येथे वार्षिक ३३६.२ मि.मी. इतका पाऊस पडतो. शिवगंगा या शहराचा कारभार महापालिकेमार्फत चालतो. मदुराईपासून हे शहर अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे.
संपूर्ण देशात स्त्री-पुरुष प्रमाण चांगले
शिवगंगा शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ४०,४०३ इतकी आहे. या शहरातील स्त्री-पुरुष प्रमाण देशाच्या तुलनेत खूपच चांगले आहे. येथे १००० पुरुषांमागे ९९० स्त्रिया आहेत. हेच प्रमाण देशात ९२९ इतके आहे.
Leave a Reply