श्रवणबेळगोळ हे कर्नाटक राज्यातल्या हसन जिल्हयातील एक महत्वाचे शहर आहे. देशभरातील जैन धर्मीयांचे हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे शहर म्हैसूरपासून ८३ कि,मी. वर असून, येथील बाहुबली गोमटेश्वराची मूर्ती ५७ फूट उंच आहे. एका अखंड पाषाणात ती कोरलेली असून , जगातील सर्वाधिक उंच मूर्ती मानली जाते. दर बारा वर्षानी येथे महामस्तकाभिषेक सोहळा केला जातो.
श्रवणबेळगोळ हे शहर युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले आहे. गोमटेश्वराच्या मूर्तीच्या पायथ्याशी मराठी आणि कन्नड भाषेतील अनेक शिलालेख कोरलेले आहेत. ज्ञात पुराव्यानुसार येथील मराठी शिलालेख हा मराठीतील सर्वात जुना लिखित मजकूर मानला जातो.
Leave a Reply