नांदगावचा सिद्धीविनायक हे स्वयंभू दैवत ज्योतिषाचार्य गणेश दैवज्ञ यांनी स्थापले हे एक जागृत व नवसाला पावणारे दैवत मानले जाते. हे मंदिर चौदाव्या शतकापासून प्रख्यात असून भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी येथील भेटीच्या वेळी या इतिहास प्रसिद्ध दैवताचे दर्शन घेतले होते.
नांदगांव हे गांव जंजिरा बंदरावरून ८ किमी. वर आहे. मुंबई -पनवेल -पेण रेवदांडा -मुरूड हा मार्ग १६५ किमी. आहे. पुणे -मुरूड २१५ किमी खोपोली मार्गे.
मंदिराची बांधणी अलीकडेच करण्यात आली असून मंदिर भव्य व प्रेक्षणीय झाले आहे. मूर्तीचे चारही बाजूने दर्शन घेता येते. कारण ती उंचावर बसविली आहे. मूर्ती उजव्या सोंडेची आहे.
Leave a Reply