सिरसी हे उत्तर कर्नाटकातील हसन जिल्हयातील थंड हवेचे ठिकाण आहे. हिरव्यागर्द झाडीने वेढ़लेल्या या शहराच्या परिसरात अनेक लहानमोठे थबथबे असून पर्यटकांचे हे आवडते शहर आहे.
या शहरात सुपारीची मोठी बाजारपेठ असून आजुबाजुच्या अनेक गावांतील सुपारी येथे विक्रीसाठी येते. येथील सुपारी देश- विदेशात पाठवली जाते.
येथील लोकसंख्या जवळपास १,२०,००० आहे.
देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या शहरांपैकी हे एक शहर आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात येथील हवामान आल्हाददायक असते.
येथील उंचली, शिवगंगा, बुरुंडे, बेनेहोल, आदी धबधबे प्रेक्षणीय आहेत. हुबळी आणि बेळगाव येथून सिरसीला जाता येते.
Leave a Reply