दक्षिण सुदान हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक तर पश्चिमेला मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हे देश आहेत. पांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्यभागातून वाहते. जुबा ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
जानेवारी २०११ मध्ये येथे घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये ९८.८३ टक्के मतदारांनी सुदान देशापासून वेगळे होण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. त्यानुसार ९ जुलै २०११ रोजी दक्षिण सुदान हा एक स्वतंत्र व सार्वभौम देश म्हणून अस्तित्त्वात आला. दक्षिण सुदानला आफ्रिकन संघ, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्यत्व मिळाले आहे. सुदान व दक्षिण सुदानदरम्यानच्या प्रस्तावित सीमेबद्दल अजून वाद व चकमकी सुरू आहेत. सुदानची ही फाळणी धार्मिक भेदांवरून झाली. दक्षिण सुदानमध्ये बहुसंख्य ख्रिश्चन आहेत तर (उत्तर) सुदानमध्ये मुस्लिम. दक्षिण सुदान हा अतिशय गरीब देश आहे. लोकांचे दरडोई दैनिक उत्पन्न ५० भारतीय रुपयांपेक्षा कमी आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :जुबा
अधिकृत भाषा :इंग्लिश, अरबी
राष्ट्रीय चलन :दक्षिण सुदानीझ पाउंड
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply