स्वीडन (स्वीडिश: Konungariket Sverige) इंग्रजीत Sweden) हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला नॉर्वे, इशान्येला फिनलंड, तर पूर्वेला व दक्षिणेस बाल्टिक समुद्र आहेत. दक्षिणेला डेन्मार्क, जर्मनी व पोलंड तर पूर्वेला इस्टोनिया, लॅटिव्हिया, लिथुआनिया व रशिया ह्या देशांसोबत स्वीडनच्या सागरी सीमा आहेत. स्वीडन डेन्मार्क देशाशी ओरेसुंड पूलाद्वारे जोडला गेला आहे.
सुमारे ४.५ लाख चौरस किमी क्षेत्रफळ असलेला स्वीडन देश युरोपियन संघामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. येथील लोकसंख्या ९४ लाख असून बहुतांशी लोक देशाच्या दक्षिण भागात शहरी क्षेत्रांमध्ये राहतात. स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी व प्रमुख शहर आहे.
ऐतिहासिक व मध्ययुगीन काळापासून स्वीडन हा एक स्वतंत्र देश राहिला आहे. सध्या स्वीडनमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही आहे. कार्ल सोळावा गुस्ताफ हे येथील विद्यमान राजे आहेत. अत्यंत विकसित व समृद्ध असलेल्या स्वीडनला लोकशाही निर्देशांकानुसार जगात प्रथम स्थान मिळाले आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :स्टॉकहोम
अधिकृत भाषा :स्वीडिश
राष्ट्रीय चलन :स्वीडिश क्रोना (SEK)
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply