मॉडर्न आर्ट गॅलरी – दिल्ली

मॉडर्न आर्ट गॅलरीची स्थापना १९५४ मध्ये दिल्ली येथे झाली. या गॅलरीत १९,२० व्या शतकातील १५ हजारांपेक्षा जास्त दुर्लभ कलाकृतीचा संग्रह आहे. राजा रवी वर्मा यांच्या कलाकृती येथे आहेत.      

खुनी दरवाजा – दिल्ली

खुनी दरवाजा दिल्ली येथे आहे. सत्तासंघर्षात औरंगजेबाने त्याचा भाऊ भाईदारा शिकोह याचे याचे धड शिरापासून वेगळे केले होते. १८५७ मध्ये इंग्रजांनी शेवटचा बादशहा जफर यांच्या दोन मुलांना येथेच गोळ्या घातल्या होत्या.

महाभारतातील युध्दाचे शहर : कुरुक्षेत्र

हरियाणा राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले हे शहर आहे. इ.स. पू. ३१०२ मध्ये येथे कौरव- पांडवांचे ऐतिहासिक युध्द झाल्याच्या नोंदी प्राचीन हिंदू धर्म ग्रंथात आहेत. कौरवांचे वंशज राजा कुरु यांनी हे शहर वसविले. येथेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य […]

पानिपत येथील कलंदरशहा मकबरा

हरियाणा राज्यातील पानीपत येथे ७०० वर्ष पुरातन मकबरा आहे. मुस्लिम सुफी संत कलंदर शहा यांचे पवित्र तीर्थस्थळ हा मकबरा आहे. इ.स. १२०९ मध्ये कलंदर शहा यांचा जन्म झाल्याची नोंद इतिहासात आहे.      

काश्मीर खोरे

जम्मू आणि काश्मीर हे खोर्‍यांचे प्रदेश म्हणूनही ओळखले जाते. काश्मीर खोरे हे या भागातील महत्त्वाचे खोरे असून, त्याची रुंदी जवळपास १०० किलोमीटर आहे. हिमालयाच्या विशाल पर्वतराजीने काश्मीर खोरे व लद्दाखला विभागले आहे. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून […]

सर्वाधिक लांब अंतर कापणारी हिमसागर एक्स्प्रेस

हिमसागर एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक लांब अंतर कापणारी रेल्वे आहे. कन्याकुमारी ते जम्मू-तावी असा ३७५१ किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करते. नवी दिल्ली ते भोपाळ अशी धावणारी शताब्दी एक्सप्रेस ताशी १२० किमी वेगाने धावते. ती देशातील सर्वात […]

कुरुक्षेत्र येथील ब्रह्मसरोवर

हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे अतिशय प्राचीन ब्रह्मसरोवर आहे. इ.स. पूर्व अकराव्या शतकात अल बेरूनी यांनी किताब-उल-हिंद असे सरोवराचे नामकरण केले. हिंदू धर्मात या पवित्र स्थळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.      

जम्मू-काश्मीरमधील शिवखोडी गुंफा

जम्मु आणि काश्मीर राज्यतील रीयासी जिल्ह्यात ही गुंफा आहे. १५० मीटर लांबीच्या या गुंफेत ४ फुट उंचीचे शिवलिंग आहे. एका मुस्लीम गुराख्याने या गुंफेचा शोध लावला असून ही गुंफा एक पुरातन धार्मिक स्थळ आहे.

अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिर

जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग येथील प्रसिध्द मंदिर आहे. सूर्याला समर्पित असलेले हे देशातील एकमेव सर्वांत सुंदर मंदिर आहे. कर्कोटक वंशाचे राजा ललितादित्य मुक्तापीड यांनी इ.स. ७२५-७५६ च्या मध्यात मंदिराची स्थापना केली. सुर्याची पहिली किरणं […]

1 17 18 19 20 21 47